राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष यांना कोरोनाचा संसर्ग


मथुरा ; दि.१३: राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये त्यांना कोगोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे. ते सध्या मथुरा येथे असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक तैनात करण्यात आलेले आहे.

दरम्यान, महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समजताच योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास, त्यांचे सहकारी आणि मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 

नृत्यगोपाल दास हे गोकुळाष्टमी निमित्त मथुरा येथे आले होते. मात्र येथे असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तत्काळ त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments