कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यस्तरीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी कसबा बावडा येथील संदीप सुरेश माळी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवाजी माळी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय माळी महासंघाची राज्य कार्यकारिणीची बैठक कराड येथे पार पडली त्यामध्ये संदिप माळी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून तसेच संदिप माळी यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक काम पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे. माळी समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील आहे. तसचे प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी लढा उभारूण्याचा मनोदय संदीप माळी यांनी निवडी नंतर व्यक्त केला.
0 Comments