पंढरपूर/प्रतिनिधी:
घराची परिस्थिती बेताची त्यात आई व वडील शिक्षक कमी होते. तरीही घरात शैक्षणिक वातावरण व आई व वडिलांच्या प्रेरणातून अभ्यासात सातत्य राखत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता आले अशी प्रतिक्रिया राहुल चव्हाण यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली़. राहुल चव्हाण यांनी युपीएससी परीक्षेत १०९ वा क्रमांकावर यश मिळवले आहे़.
राहुल चव्हाण हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील रहिवासी आहेत़. वडिल खर्डी येथे काम धंदा करतात. राहुल पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे खर्डी येथेच झाले़. ९ व १२ वीचे शिक्षण पंढरपूर घेतले़. राहुल यांना दहावीत ९४ टक्के तर बारावीला ८८ टक्के गुण मिळाले होते़ १२ वीनंतर राहुल याला डॉक्टर होण्याची इच्छा होती.
मात्र काही आरोग्याच्या समस्या असल्यामुळे त्यांनी डॉक्टर न होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे ठरवले होते. १२ वीच्या पास झाल्यानंतर २०१५ पासून पुणे येथे स्पर्धा परिक्षा अभ्यासाची तयारी सुरू केली़. एक नव्हे दोन नव्हे तर तीन वेळा अपयश आल्यानंतर खचून न जाता राहुल याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले़.
तिसऱ्यांदा यश मिळालेच़ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली तर फेब्रुवारी २०२० मध्ये मुलाखत प्रक्रिया पार पडली होती़. अभ्यासातील सातत्य आणि कठीण परिश्रमाशिवाय यश मिळत नसते असे सांगताना. आई वडील, शिक्षक, पुणे येथील मित्र, सहकारी यांचे मार्गदर्शन आपल्या यशात मोलाचे ठरल्याचे ते म्हणाले़
0 Comments