३१ ऑगस्टपर्यंत पंढरपुरचे मंदिर खुले करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल ; अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर



पंढरपूर/प्रतिनिधी; पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पूर्वी खुले झाले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

दरम्यान, देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशातील देवस्थान बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र पुनश्च हरिओम अंतर्गत राज्यात अनलॉकची संकल्पना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये टप्पाटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र देवस्थान खुली करण्यात अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही.

ह्या सगळ्या कारणांचा विचार करुन पंढरपुरात विठ्ठल मंदिराचे खुले करावे. 

Post a Comment

0 Comments