सांगली दि.२८; स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी मोठी मदत करेन असे बाता मारत बंगल्यावर घेऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यावर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पीडित २८ वर्षीय मुलीने कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हसबनिस कासेगाव बसस्टॉपवर म्हणाले, लॉकडाऊन असल्याने तुम्हाला वाहन मिळणार नाही ,तुम्हाला मी कराडला सोडतो गोड बोलून ओळख करून घेतली. त्यानंतर गाडीतून कासेगावहून कराडकडे जात असताना संबंधित तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. माझी पत्नी स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक आहे असे सांगून कडेगाव येथील बंगल्यावर बोलवून घेतले व वारंवार बलात्कार केला
याबाबत पीडित मुलीने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments