बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मोबाईलची रींग वाजली
राहूल खंडागळे यांचा तो काॅल दबक्या आवाजात बोलला, इंदिरा वसाहत येथे निराधार आजीचा मृत्यू झाला तिथे कोण आहे का..?? विचारताच लगेच राहूल बोलला, चांगा मामा (चांगदेव कांबळे)राहूल ने मोबाईल चांगा मामा ला दिला मी विचारले, आंजीला कोणी पै पाहुणे आहेत का..?? असे मी विचारताच मुलगी आहे तिला काही समजत नाही असे चांगा मामा बोलले ठीक आहे. मी आवरून येतो, म्हणून मी काॅल बंद केला. मी माहिती घेण्यासाठी शशांक पाटील वडगाव नगरपालिकेचे हाॅस्पीटल चे कर्मचारी यांना काॅल केला, त्यांनी मला सांगीतले. पहिले पोलीस स्टेशन ला कळवावे लागेल, नंतर नगरपालिकेत कळवावे लागेल ,मी राहुल खंडागळे यांना काॅल करून लगेच पोलीस स्टेशन ला जाऊन याची कल्पना देऊन नोंद करा असे सांगीतले. थोड्याच वेळात मला पोलीस स्टेशन मधून दुकाणे व रवी गायकवाड साहेबांचा काॅल आला, आम्ही नोंद करून घेतले आपन नगरपालिका आरोग्य विभागला कळवा, मी धन्यवाद म्हणून काॅल बंद केला.
आरोग्य विभागला सांगण्या पेक्षा मला मुख्याधिकारी सुष्मा शिंदे ( कोल्हे ) सांगणे योग्य वाटले. कारण आम्हाला जास्त वेळ घालवायचा नव्हता मॅडमनी सगळी यंत्रणा फास्ट कामला लावून मला लगेचच काॅल करून सांगीतले. त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी लावून दिलेत असे म्हणतात. तो पर्यंत माझ्या समोर नगरपालिकेचे कर्मचारी संदीप धनवडे ,संभाजी जाधव,प्रशांत आवळे,ओंकार मुंदाळे हे त्या ठिकाणी पोहचले. मॅडमना धन्यवाद म्हणून काॅल बंद केला संदीप ने येतानाच पी पी ई कीट सोबत आणलेले, वडगाव प्रेस रीपोर्टल ची ॲब्युलन्स ही त्या ठिकाणी पोहोचली. लगेच बजरंग दलचे किरण कोळी, परमधाम सेवा संस्थेचे संतोष पुरोहीत, राज कोळी,विकास कांबळे,सहारा ग्रुप चे अध्यक्ष भालचंद्र कोळी ,धनाजी घोगरे तसेच इंदीरा काॅलणीतील नागरीकांनी विधीवत अंत्यसंस्कार करत सामाजिक जबाबदारी पार पाडली.
आजीने निराधार असूनही परिसरात माणसे जोडली होती.तिच्या मृत्यूनंतर अनेकांचे डोळे पानावले.तर काहींना साडी,कापड दिले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी विधीवत अत्यंसंस्कार करत सामाजिक जबाबदारी पारपाडत असताना पोलीस , नगरपालीका ,वडगाव प्रेस रिपोर्टर ,सामाजिक संस्था तसेच भागातील नागरीकांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानतो.
सचिन महादेव चव्हाण
अध्यक्ष वडगाव शहर काॅंग्रेस
0 Comments