खासदार ओमराजे निंबाळकर सुर्डी गाव दत्तक घेणार....

भारत सरकारच्या सूचनेनुसार प्रत्येक वर्षी खासदार एक गाव दत्तक घेतात २०२०-२०२१ साठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यातील सुर्डी हे दत्तक घेण्याच्या प्रकियेला वेग आला आहे. पाणी फाऊंडेशनच्या घेतलेल्या वॉटर कप स्पर्धेत सुर्डी गावाने गतवर्षी प्रथम क्रमांक पटकावला होता.

 सगळे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार निंबाळकर यांनी सुर्डी गावाची निवड केली केली आहे. या निर्णयाचे ग्रामपंचायत सुर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ह्या योजनेला सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली होती.माजी खासदार तथा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी हि परांडा तालुक्यातील डोंजा हे खासदार संसद आदर्श ग्राम योजना दत्तक घेतले होते.

Post a Comment

0 Comments