अधिवेशनात आमदारांना फेस शिल्ड, मास्क, हॅन्ड ग्लोज घालावे लागणार


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणारे दोन दिवसाचे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरक्षित सोशल डिस्टंसिंग कशाचे पालन करून व सुरक्षेविषयी आवश्यक ती उपाययोजना करून घेण्यात येणार आहे

येत्या सात आणि आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशन हे तेव्हा दोन दिवस चालणार आहे. २५ ऑगस्ट झालेल्या कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत दोन दिवसाचे कामकाज ठरवण्यात आले, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षा दलाचे पालन करून अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी सर्व आमदार आरटीसीपीआर तपासणी करण्यात येणार आहे ज्या आमदाराची कोड चाचणी निगेटिव्ह असेल अशाच आमदारांना अधिवेशनात उपस्थित राहता येईल.

 सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्ये करण्यात येणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे, या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, सॅनिटायझर वस्तूचा समावेश असेल. या अधिवेशनात आमदाराच्या एकाला विधिमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. शोकप्रस्ताव,अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या,विनियोजन विधेयक यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे.

Post a Comment

0 Comments