जामगावच्या सरपंच पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


मोहोळ/प्रतिनिधी; मोहोळ तालुक्यातील जामगाव येथील सरपंचाचा पत्र नामदेव मारुती डांगे यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा अंतर्गत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत मच्छिंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, "भीमनगर मध्ये पाणी का सोडत नाही? या कारणावरून नामदेव डांगे व ग्रामपंचायत शिपाई ननवरे यांच्याकडे विचारणा केली असता, तुला काय माज आला काय?  तुला बघून घेतो, यासह जातिवाचक शिवीगाळ करून श्रीकांत गायकवाड याच्या शर्टची गच्ची धरली व हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले, त्यावेळी श्रीकांत गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तयार झाली आहे.अशा आशयाची तक्रार कामठी पोलीस ठाण्यात दाखल झाली. तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर शिंदे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments