आजरा / प्रतिनिधी: देवर्डेपैकी माद्याळ ता आजरा येथे सलग दुस-या दिवशीही हत्तीने धुमाकूळीचे सत्र सुरूच ठेवले असून उस व भाताचे मोठे नूकसान केले आहे.
येथील रांगी नावाच्या शेतात शुक्रवार दि २८ रोजी उसाचे व भाताचे नूकसान केले होते. पुन्हा शनिवारी मध्यरात्री शिवाजी शेळके, विठ्ठल बोलके, तुकाराम बोलके, सुरेश शेळके, महादेव शेळके, हणमंत शेळके, विठोबा बोलके, जयवंत बोलके, शामराव बोलके आदी शेतक-यांचे उस व भाताचे मोठे नूकसान केले आहे.
देवर्डे येथील जंगलात हत्ती वास्तव्यास आहे. जंगला शेजारी असलेल्या रांगी नावाच्या शेतात उस व भाताचे मोठे क्षेत्र आहे. रात्रभर शेतात येऊन धुमाकूळ घालत आहे. सकाळी कृष्णा शेळके यांच्या शेतातील विहिरीतील पाणी गढूळ करून पुन्हा जंगलात वास्तव्यास जात आहे.
सततच्या नूकसानीमूळे शेतकरी हैराण झाला आहे.पिकांचे मोठे नूकसान होत असल्याने हत्ती, गव्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

0 Comments