राज्यात ई-पास तातडीने रद्द होणार नाही, पुढील निर्णय येईपर्यंत ई-पास असणार आवश्यक ; गृहमंत्री देशमुख



आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे रविवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ई-पास आवश्यक असणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आणि कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र आता केंद्राने ई-पासची अट रद्द केली आहे. यानंतर राज्यातील ई-पासही रद्द होईल अशी शक्यता होती. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.

यानंतर गृहमंत्री अनिल देखमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुधा १ सप्टेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Post a Comment

0 Comments