बार्शी बाजार समितीत उडीद मुगाची विक्रमी आवक; उडीद-मुगाचे २० हजार कट्टे बाजारात दाखल



मूग व उडीद तत्काळ पैसे देणारे नगदी पिके आहेत, यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर पडला त्यामुळे खरिपाच्या पिकाची नियोजन चांगल्या प्रकारे आहेत,सणासुदीच्या दिवसात पैसे मिळवून देणारे पिके आहेत. सुरवातीच्या टप्प्यात उडदाचे चौदा हजार कट्टे, तर मुगाचे सहा हजार खड्डे दाखल झाले आहेत.

उस्मानाबाद नगर बीड मधून या पिकांचे विक्रमी असल्याने बार्शी बाजार समितीत दाखल झाला आहे, उडदाला उद्याला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेसहा हजार तर मुगाला ३५०० ते ६२०० रुपये दर मिळत आहे.

सुरुवातीच्या टप्प्याचं उडदाचे विक्रमी आवक झाली असून भाव चांगला मिळत आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने गतवर्षी पाणी फाऊंडेशनचे काम केले, त्यामुळे पाणीपातळीही वाढल्याने एकटा 'सुर्डी' गावातून ३००० ते ४००० कट्टे मालाची आवक दिसून आली.

Post a Comment

0 Comments