राज्यापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ही राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळाला. भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडली नाही परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात पहिल्यांदाच शिवसेनेला नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.
अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहे. अनिल परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनिल परब यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
0 Comments