पाचगावात कोरोनाचा दुसरा बळी....

(प्रतिकात्मक फोटो; गुुुगल)
पाचगाव/ प्रतिनिधी ;

पाचगाव मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून अशातच प्रगती नगर मधील एका कापड विक्रेत्याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आज दि २३ रोजी पाचगाव दिप सेवक सोसायटी मधील वय वर्ष ६५ यांचा कोरोना या आजाराने मृत्यू झाला, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चे थैमान चालू आहे, कोरोना बाधित व्यक्ती मयत हि होत आहेत.

पाचगाव मधील मयत व्यक्ती  एम.एस.सी. बी मध्ये काम करत होते.(सध्‍या रिटायर आहेत) काही महिन्यापूर्वी पाचगाव मध्ये एकही रुग्ण नव्हता पण गेल्या काही दिवसापासून कोरणा रुग्णांची संख्या वाढत असल्याने पाचगावची चिंता वाढत चालली आहे. दिपनगर सोसायटीमधील मृत्यू पावलेल्या घरातील सदस्य कॉरंट टाईन केलेले आहेत. ग्रामपंचायतीने त्या परिसरात औषध फवारणी केली आहे.

Post a Comment

0 Comments