बायकोचे भावाशी अनैतिक संबंध, पतीला समजताच काढला सख्ख्या भावाचा काटा!


लखनऊ: आपल्या मोठ्या भावाने आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचे कळताच धाकट्या भावाने आपल्या भावाचा काटा काढला. आपल्या दुसऱ्या भावाला सोबत घेऊन भाजीच्या चाकूने मोठ्या भावाच्या गळ्यावर सपासप वार केले. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ही घटना घडली.

लखनऊमध्ये अनैतिक संबंधांमुळे दोन धाकट्या भावांनी भाजीच्या चाकूने त्यांच्या मोठ्या भावाला गळा आवळून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आशिष यादव हे पत्नीसह लखनऊच्या चिन्हाट मटियारी या गावी राहत होते. त्याचे दोन भाऊ आलोक व अंकुर घरी पोहोचले. यावेळी या दोघांनी भाजीच्या चाकूने मोठ्या भावाच्या गळ्यावर वार करुन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी आशिषच्या पत्नीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

लखनऊ पूर्व विभागाचे एडीसीपी अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आलोक आणि अंकुर हे दोन भाऊ घरात आले. यानंतर त्याने चाकूने गळ्यावर वार केले. आलोकच्या पत्नीबरोबर मृत आशिष यादव याचे अनैतिक संबंध असल्याबद्दल खून करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments