पंढरपूर/प्रतिनिधी;
महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्याचे वेतन सहाय्यक अनुदानाची रक्कम गणेश उत्सवापुर्वी २२ ऑगस्ट रोजीपर्यंत कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करावी अन्यथा २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून काम बंद व बोबांबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या कोरोनाच्या महामारीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख, संवर्ग कर्मचारी, शिपाई, सफाई कामगार यांनी राज्यातील भाजी मार्केटमधील गर्दी रोखणे, किराणा आणि मेडिकल दुकानातील गर्दी थांबवणे, प्रत्येक शहरात बाहेर गावाहून आलेल्या आणि येणाऱ्या लोकांची तपासणी करणे, घराघरात जाऊन सर्व्हे करणे, डॉक्टरांसोबत जाऊन प्रत्येकाची तपासणी करणे, प्रत्येक घरातील संशयित कोरोना बाधित रुग्णावर लक्ष ठेवणे अशा प्रकारची कामे राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका, परिषदेमधील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के जीव धोक्यात घालून काम केले आहे.
एक ऑगस्ट रोजी पर्यंत महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्याचे वेतन सहाय्यक अनुदानाची रक्कम जमा होणे गरजेचे होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ३३९ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतनापासुन वंचित ठेवले आहे. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा न झाल्यास २४ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून काम बंद व बोबांबोंब आंदोलन
इशारा राज्याचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर यांनी प्रसिद्धपत्रकाव्दारे दिली.
0 Comments