तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे बार्शी तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार


 

बार्शीचे प्रभारी तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडे दिलेला बार्शीचा पदभार एक महिन्यात काढून घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे बार्शीच्या तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. शनिवारी त्यांनी तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडून पदभार घेतला.

तहसीलदार कुंभार यांनी डेप्युटी इंसिडेंट कमांडर म्हणून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. तहसीलदार कुंभार यांच्याकडे जिल्हा निवडणूक शाखेचा मूळ पदभार आहे. तेथील कामाचा व्याप अधिक आहे. त्या कामाच्या व्यापामुळे ते बार्शीला अधिक वेळ देवू शकत नव्हते. 

ह्या गोष्टींमुळे बार्शी च्या तहसीलदार पदाचा कार्यभार किरण जमदाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments