दान झालेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करणार; संभाजीनगर व नेहरूनगर प्रभागातील नागरिकांसाठी विशेष उपक्रम- नगरसेवक किरण नकाते

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांना नदीकाठी व तलावावर विसर्जनास मनाई केली आहे. यास्तव नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी त्या त्या प्रभागात कृत्रिम कुंडांची सोय केली आहे. 

याच उपक्रमाचा भाग म्हणून संभाजीनगर व नेहरूनगर प्रभागातील नागरिकांसाठी नगरसेवक किरण नकाते व मैत्रीण फाउंडेशन यांच्या वतीने जमा केलेल्या सर्व गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

याबद्दल बोलताना नगरसेवक श्री किरण नकाते म्हणाले की, " कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढत आहे. यामुळे सण असूनही आपणास काही गोष्टींची मर्यादा पाळावी लागणार आहे. यास्तव नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही जमा केलेल्या सर्व गणेशमूर्ती विधिवत विसर्जित करणार आहोत. सणाचे पावित्र्य जपत,भाविकांच्या भावनांचा आदर राखत व शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी घरीच गणेशमूर्ती टब मध्ये विसर्जित कराव्या. या मूर्तींचे संकलन करण्यासाठी आम्ही वाहनाची सोय केली आहे."

Post a Comment

0 Comments