गौरी गणपतीसाठी घरी निघालेल्या बार्शीच्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू


बार्शी; महालक्ष्मीच्या सणासाठी पुण्याहून बार्शी कडे स्वतःच्या घरी निघालेल्या शिक्षकांच्या जुपिटर गाडीला कारने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, हे घटना कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावरील म्हैसगाव येतील बस स्टॉप जवळ घडली, पांडुरंग सोपान शिंदे वायकुळे प्लॉट, बार्शी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. 

पत्नी सुवर्ण गौरी पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालक राहुल देवानंद खराडे( डोंबिवली) यांच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग शिंदे हे पुणे जिल्ह्यातील अमोंडी ता. आंबेगाव इथे नोकरी करत होता. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments