खोचीतील चौगुले हायस्कूलचा सेमी विभागाचा १०० टक्के व मराठी विभागाचा ९७ टक्के निकाल


खोची / प्रतिनिधी : 

खोची येथील कै .अँड  प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल खोची या संस्थेतील प्रशासनाच्या सहकार्याने तसेच विद्यार्थ्यांना यशाला पाठिंबा देण्यासाठी असलेले सर्व प्रशासन व विद्यार्थ्यांचे अतोनात परिश्रम यामुळे उत्तम निकाल या संस्थेचा लागला आहे.कै .अँड प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूलचा दहावी परिक्षेचा सेमी विभागाचा शंभर टक्के तसेच मराठी विभागाचा ९७ टक्के निकाल लागला आहे. अनुक्रमे निकाल असा सेमी विभाग - स्नेहल पोवार ( ९७.६०टक्के ), श्रेयस मडके (९७.२० टक्के) ,सुहानी कोळी (९६.२० टक्के ) ,सानिका सुतार (९४ टक्के ) , संकेत आडके ( ९३.६०टक्के ).
              
तसेच मराठी विभाग निकाल अनुक्रमे असा - किरण पाटील ( ८९.०० टक्के ) ,अर्पिता कागवाडे (८६.८९ टक्के) ,प्रतिमा जाधव  (८५.८०टक्के ) ,हेमश्री पाटील ( ८५.०० टक्के) ,ऋतुजा वाघ ( ८४.६०टक्के ) या सर्व विद्यार्थ्यांना अध्यक्ष अँड जंयवतराव चौगुले,उपाध्यक्ष अण्णासो चौगुले, सचिव अँड आशिष चौगुले ,मुख्याध्यापक जे.आर.करांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments