कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही.
राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना १ लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.
कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजपासोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.
0 Comments