आठवडा बाजार सुरू करण्यासाठी आजरा तालुका शिवसेना व युवा सेनेचे वतीने तहसीलदारांना निवेदन


राकेश करमळकर/आजरा;

कोरोनाच्या महामारी मुळे सर्वत्रलॉक डाऊन पाळण्यात आला होता त्यामुळे कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी आजरा शहरांमध्ये होणारी गर्दी पाहता तालुक्यामध्ये होणारा आठवडा बाजार जिल्हा प्रशासनाने गेले काही महिने बंद केला आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.                                                                              
गणेश चतुर्थी चा सण जवळ आल्यामुळे या सणाच्या खरेदी निमित्त सजावटीचे व सणासुदीची इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठ सुरू करण्यात यावी यासाठी आजरा तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख महेश पाटील, शहर प्रमुख ओमकार माध्याळकर, सागर नाईक, रवी यादव यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments