मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले. तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.
मुख्यमंत्र्यांनी के पूर्व विभाग विलेपार्ले येथील पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली.
फिरत्या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल आणि गिरगाव चौपाटी व इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
0 Comments