राष्ट्रवादीच्या ‘दादागिरी’ने शिवसेना, काँग्रेस हैराण




कुरकुर काही थांबेना, उपमुख्यमंत्री अजित पवार ऐकेनात अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटेनात

महाराष्ट्र महाविकास आघाडीतील धुसफूस संपायचे नाव घेत नाही. स्वपक्षाच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी, अधिकाऱ्यांच्या बदल्या, वित्त विभागांत नस्ती लटकणे अन् टाळेबंदी याप्रश्नी राज्य सरकारमध्ये धुसफूस कायम आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेसच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वपक्षाचे आमदार राष्ट्रवादीच्या दादागिरीने हतबल आहेत.

बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसवर निधीवाटपाबाबत दुजाभाव होत असल्याचे बोलले आहेत, जालन्याचे खासदार संजय जाधव यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. निधी वाटपाविषयी त्यांचे काही आक्षेप असतील तर अर्थमंत्री अजित पवार त्यावर उत्तर देतील, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अर्थमंत्री अजित पवार पैसे देत नाहीत अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत,अशी काँग्रेस आमदारांची गोची झाली आहे.

राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे या व्यायामशाळा आणि चित्रपटगृहांना टाळेबंदीतून सूट द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांना सातत्याने मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री टाळेबंदीत सूट देण्यास तयार नाहीत. बकरी ईदला बकरा खरेदी आँँनलाइन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. यंदा कोरोना महामारीमुळे १५ टक्के बदल्या होत आहेत. ज्या बदल्या झाल्या त्या शिवसेना अन् राष्ट्रवादीला हव्या असणाऱ्या झाल्या. मात्र, काँग्रेसच्या मंत्र्यांना हव्या असणाऱ्या बदल्या न झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी कायम आहे.

Post a Comment

0 Comments