पिरपंजा व गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश



एकात्मतेची परंपरा दोन पिढ्यांपासून जपतात पेठ वडगांवकर

धनंजय खराडे/पेठ वडगांव:

कोरोनाचा पार्श्वभूमीवर गणेश उत्सव आणि ताबूत बसवणे हे दोन्ही सण एकत्र आले. साळी गल्ली,आंबा रोड जवळ मोलाअली दर्गा मध्ये पिर पंजा व गणेश मूर्ती ची एकत्र प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा संदेश गावकऱ्यांनी दिला आहे.

जमीर बाबसो महादार(बारुद) यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्ग्यामध्ये रोज रात्री आठ वाजता गणेश मूर्तीची आरती सर्व धर्मीयांच्या उपस्थित होते.भक्तांना कोरोना संकटा मधून मुक्त करण्यासाठी पीरा जवळ दुवा केल्याचे त्यांनी सांगितले व भक्तांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुर्ण पणे शांताप्रिय असा सण साजरा करण्याचे त्यांनी आव्हान केले.
दर्ग्यामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी त्यांनी कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची सोय केलेली आहे.

आज मोहरम निमित्त सर्व पंजान उद घालण्यासाठी व मलिदा देण्यासाठी सर्व समाज बांधव आज बाहेर पडतात पण कोरोनामुळे लोकांना आज बाहेर न पडण्याचे आव्हान प्रशासना कडून करण्यात आले आहे त्याच प्रमाने खाई न खेळण्याचे सुद्धा आव्हान करण्यात आले आहे.कोरोनाच्या या संकटामुळे सार्वजनिक सणावर व व्यापारी वर्गावर परिणाम झाल्याचे आपल्याला पहावयास मिळते.

Post a Comment

0 Comments