राकेश करमळकर / आजरा :
आजरा शहरात आज मध्यवस्तीत प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरसह ८जण बाधित आढळले आहेत. यामुळे आजरा वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. संबंधित डॉक्टर बाधित होण्यामागे सूतगिरणी कनेक्शन तर इतर बाधितांमगे स्थानिक संपर्क कारणीभूत असल्याचे समजते.
हाजगोळी येथील बाधित रुग्ण संपर्क झाल्याचा कयास आहे. त्याशिवाय इतर गावातील ५ जण बाधित आढळले आहेत. धामणे, हाजगोळी, सरोळी, मडीलगे, देवर्डे येथे एकेक मिळून ५ बाधित सापडल्याने एकूण १३ बाधित आढळले आहेत.
0 Comments