राकेश करमळकर/आजरा;
असे कळते की आजरा पंचायतीच्या हद्द सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असतानादेखील सदर चा भाग का वगळण्यात आला यावरून एक स्वीकृत नगरसेवक व कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावरून सदर नगरसेवकांनी त्या दोन कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीच्या कार्यालयात एका खोलीमध्ये कोंडून घातले व शिवीगाळ केली याबाबतचे निवेदन कर्मचारी संघटनेने मुख्याधिकारी, तहसीलदार व आजरा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे. तर आज पासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन चालू केले आहे.
कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की स्वीकृत सदस्यांनी फोन करून वैयक्तिक कामाकरिता भूमी अभिलेख कार्यालयातून माहिती मागवण्यासाठी अर्ज टाईप करून देण्यास सांगितला होता. सदरचे काम केले नाही म्हणून नगरपंचायतीचे मुख्य लिपिक व सहाय्यकास सदर सदस्याने कार्यालयातील मिळकत विभागाच्या खोलीमध्ये डांबून घातले सदर कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडण्याची वारंवार विनवणी केली असता संबंधित सदस्याने शिवीगाळ केली. कोरोना सदृश्य स्थिती मध्ये कुटुंबाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करून कर्मचाऱ्यांना अशी वाईट वागणूक मिळत आहे. संबंधित सदस्याने जाहीर माफी मागितले खेरीज काम बंद आंदोलन बंद केले जाणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
0 Comments