आज दिवसभरात ४६२ नवे रुग्ण आढळुन आले. हुपरीतील कोरोना रुग्णाचा आकडा २०० पार गेला आहे. हुपरी हे शेजारील पाच गावाची मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याचबरोबर हे शहर कर्नाटक सीमेला लागून असल्याने सीमा भागातील लोकांची ये-जा कायम असते.
मुरगूड येथे ३ ते १० ऑगस्ट दरम्यान जनता कर्फ्यू असणार आहे.
कोल्हापूर मध्ये आजचे कोरोना बाधित रुग्ण ४६२ आहेत. आजपर्यंत एकूण ६९०५ बाधित रुग्ण झाले आहेत.आज २०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६३९ इतकी आहे. एकुणच कोल्हापुर जिल्हात कोरोना संबधि चिंतादायक परिस्थिती आहे.
0 Comments