आरटीओची शिबिरे पुन्हा तालुकास्तरावर होणार



सोलापूर ; राज्य परिवहन कार्यालयाकडून तालुका स्तरावर घेण्यात येणारी शिबिरे आता पुन्हा नव्याने उत्साहाने सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गावोगावी होणाऱ्या आरटीओ परवाना शिबिरांना थांबा लागला होता. 

आता रोज घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तीन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २३ रोजी  मंगळवेढा, २५व २६ रोजी पंढरपूर, २७ रोजी बार्शी तर २८ रोजी मोहोळ इथे वाहन परवाना शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आरटीओ कार्यालय, सोलापूर यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments