विविध मागण्यांसाठी आजरा नगरपंचायत कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी



राकेश करमळकर/आजरा;
         
आजरा नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर कामकाज ठप्प ठेवून नगरपंचायती समोर  जोरदार घोषणा देऊन एक दिवसीय आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसाचा संप सोमवार दि.१७ रोजी पुकारण्यात आला या संपामध्ये आजरा नगरपंचायतिचे सर्व कर्मचारी सहभागी झाले .त्या याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे दिले होते.
      
नगरपंचायत व नगरपरिषद यामधील कर्मचाऱ्यांचे पगार कोषागार येथे करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता त्वरित मिळावा, लिपिकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू व्हावी , नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांचे समायोजन तात्काळ करावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे, लिपिकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांना तत्काळ पक्की घरे बांधून मिळावीत, कर प्रशासकीय सेवा अधिनियम सेवा स्वच्छता निरीक्षक सेवा २८०० ग्रेड पे ऐवजी४२०० ग्रेड पे लागू व्हावा, सर्व वरिष्ठ वेतन श्रेणी स्तरातील कर्मचाऱ्यांना राजपत्रित दर्जा देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments