सोलापूरच्या 'उजनी' पुण्याच्या पावसावर अवलंबून



उजनी धरणाकडे सोलापूरसह पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही लक्ष लागलेले आहे. धरण कधी एकदा शंभर टक्के भरते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. एकदा धरण भरले म्हणजे वर्षभराची पाण्याची भ्रांत संपून जाते. धरण भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसू लागतो. त्यामुळे धरण कधी भरणार याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. 

सोलापूर जिल्ह्यात असलेले उजनी धरण भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस पडणे अपेक्षित असते. पुण्याच्या पावसावरच उजनी धरणाची मदार आहे. यंदा उजनी धरण परिसरातच चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वजामधून अधिक झाली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस असल्याने त्याठिकाणाहून उजनीत पाणी आलेले नाही. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमीच असल्याचे दिसून येते. 

पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याशिवाय ही धरणे भरणार नाहीत व पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याशिवाय उजनीत पाणी येणार नाही हे समीकरण सरळ आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुणे जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात घालत आहेत. मागील वर्षी या काळात पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. 

Post a Comment

0 Comments