सिरसाव गावचे कोरोना योद्धा राजाभाऊ मिसाळ म्हणायचे 'आपलं गाव वाचलं पाहिजे'...


सिरसावला कोरोनापासून वाचवण्यासाठी लढलेले लढवय्या आदर्श शिक्षक....

कोरोनाच्या जागतिक स्तरावर सर्वत्र प्रशासनातील सर्व यंत्रणा वेगाने  काम करत आहेत. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन,विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी सर्वजण कोरोना विरुध्द लढा देत आहे.

देशात नव्हें तर जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या देशात या कोरोना पासून गेल्या चार पाच महिन्यांपासून प्रत्येक गावांतील प्राथमिक शाळेतील  शिक्षक हे अहोरात्र झटत आहे. असाच एक कर्तव्यनिष्ठ व सामाजिक जाणिव असलेला शिक्षक सध्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देतोय. ते म्हणजे सिरसाव मधील राजाभाऊ मिसाळ. "आपलं गाव वाचलं पाहिजे," या एका उद्दिष्टाने झपाटून कामास लागलेल्या या शिक्षकाच नाव आहे राजाभाऊ मिसाळ.

 प्रशासनाने  नागरिकांमध्ये याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली आहे. मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे अशा मूलभूत गोष्टी विविध माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविल्या आहेत. स्वच्छतेचा व चांगल्या आरोग्याचा संदेश घरोघरी दिला. ह्या कामी मिसाळ सरांनी मोठया प्रमाणात जनजागृती करीत गावांत बद्दल घडवून आणला. 

गेल्या दोन तीन महिन्यात गावांत लग्नसोहळे मोठया प्रमाणावर पार पडले, त्यादिवशी तर हा शिक्षक दिवसभर उभा राहुन लोकांना सूचना करताना, समजून सांगताना अनेकांनी पाहिलं आहे. सगळे त्यांनी आपल्या सिरसाव गावांसाठी प्रामाणिकपणे केले आहेत.

कोणताही स्वार्थ  मनात न ठेवता, प्रसिद्धीचा आव न आणता राजाभाऊ मिसाळ अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपत आहेत. गल्लोगल्ली फिरुन एवढ्या मोठया लोकसंख्येच्या गावात त्यांनी जनजागृती उल्लेखनीय आहे. अशा या कोरोना योद्धाच्या कार्याला सलाम. त्यांच्या पुढील सर्व सामाजिक कार्यास मनस्वी शुभेच्छा
   
माझा गावं ! माझा अभिमान!!

Post a Comment

0 Comments