कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूरातील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा राज्यात उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर कार्यालयांनी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातर्फे कोरोना ग्रस्तांसाठीच्या व्हेंटिलेटर बाय पॅप हे यंत्र जिल्हाप्रशासनाकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाचा समूह संसर्ग टाळाणे गरजेचे आहे.
नागरीकांनी लक्षणे आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध यंत्रणेकडून तपासणीकरुन घ्यावी. कोल्हापूर धर्मादाय आयुक्तालयाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यालयाने आपल्या दानशूरकृतीतून एक वेगळा ठसा महाराष्ट्रात निर्माण केल्याचे गौरवोद्गार सतेज पाटील यांनी काढले. जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोल्हापूरचे दातृत्व वाखाणण्या जोगे आहे. धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी धर्मादाय कार्यालयाकडून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
अधिक्षक शिवराज नाईकवाडे यांनी स्वागत व प्रस्तावना करताना दानशूर संस्थांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला धर्मादाय उप आयुक्त प्रदिप चैधरी, पूरग्रस्त सहाय्यता निधी समितीचे अध्यक्ष भरत ओसवाल, उपाध्यक्ष किशोर शहा, सचिव अॅड. अमित बाडकर, चॅरिटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ वैभव पेडणेकर, उद्योगपती व्ही बी. पाटील, ॲङ प्रविण कदम, ॲङ डी. एस. पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्य वधर्मादाय आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच वकीलांसह मान्यवरांचे सहाय्य लाभले. गतवर्षीच्या महापूरावेळी धर्मादाय कार्यालयातर्फेे पुरग्रस्तसहाय्यता समिती नेमून या समितीमार्फत पुरग्रस्तांना मदत केली होती.
त्यातील शिल्लक २० लाख रूपयांच्या निधीतून कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक आयएमएस बीआयपीएपी ही व्हेंटिटर खरेदी करण्यात आली. मंगळवारी यातील १५ ऑक्सीजन यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त रामदास वाबळे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त रुपाली कोरे यांच्या हस्ते पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलतदेसाई यांच्याकडे ही यंत्रे सुपूर्द करण्यात आली.
0 Comments