खळबळजनक : लॉकडाउन दुसऱ्या दिवशी पंढरीत २२९ कोरोना रुग्ण..


पंढरपूरात कोरोनाची एक हजारांकडे वाटचाल 
पंढरपूर/प्रतिनिधी:

 पंढरपूर शहरी भागासह  ग्रामीण भागात शुक्रवारपासून संचारबंदी असलेल्यामुळे  प्रशासनाच्या वतीने  रॅपिड ॲंटीजेन टेस्टची मोहीम सुरु करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या  दिवशी कोरोनाने उच्चांक गाठत तब्बल २२९ नवीन कोरोना ग्रस्ताची भर पडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा ९८० च्या घरात पोचला आहे. 
   
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  शहरात रॅपिड ॲटीजेन टेस्टची मोहिम सुरु असून नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेवून , आपली आरोग्य तपासणी करुन करत आहेत. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करताना दिसत आहे. आज दिवसभरात सकाळीच्या सुमारास ११५ जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले होते तर संध्याकाळच्या सुमारास अजून ११४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पंढरपूर लॉकडाउनच्या दोन दिवसात तब्बल ३२४ कोरोना रुग्ण आढळले आहे. सात दिवसाच्या लॉकडाउनच्या काळात कोरोनाची संख्या वाढन्याची शक्यता आहे.
  तालुक्यातील टाकळी व भोसे येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. टाकळी हा परिसर पंढरपूर शहराला लागूण असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्ट सुरुवात केली आहे. भोसे गावात कोरोनाचा कहर पहिला मिळत आहे. एक दिवसात  ८५ जणांना रॅपिड ॲटीजेन टेस्टची मोहिमेत कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, संचारबंदीच्च्या कडक अंमलबजावणीसाठी  शहरात १३७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच २५०कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन दिवसात शहरात मोकाट फिरनाऱ्या १४५ जणांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. 
रॅपिड ॲटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी नागरिकांनी चिंतीत न होता रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. हे लक्षात घेवून रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि कोरोनाची साखळी तोडण्यास अधिकाअधिक भर देण्यात येणार असल्याचे घोडके यांनी  सांगितले.

Post a Comment

0 Comments