ब्रेकींग....महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती


भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपील निवृत्ती जाहीर केली. ही माहिती धोनीने इंस्टाग्रामवरून दिली. धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यादा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. पण काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला.

धोनी आयपीएल खेळण्यासाठी काल चेन्नईला रवाना झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर चेन्नईच्या संघातील खेळाडू होते. त्यावेळी धोनी हा फक्त आयपीएलचा विचार करत असेल, असे वाटले होते. कारण आयपीएलच्या कामगिरीवर धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवलंबून होती. त्यामुळे धोनी आधी आयपीएल खेळेल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय करीअरचा काही दिवसांनी निर्णय घेईल, असे वाटत होते. पण तसे घडलेले पाहायला मिळाले नाही.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने अचानक सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांना धक्का बसला. धोनीच्या निवृत्ती पाठोपाठ भारतीय संघातील त्याचा सहकारी सुरैश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर करत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments