उजनी धरण भरण्याच्या मार्गावर; बळीराजा सुखावला


जेऊर/प्रतिनिधी:

उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने, नदीकाठावर असलेले पंप काढण्यासाठी शेतकरी बांधवांची लगबग चालू आहे. मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ असून गुरुवारी धरणातील पाणी साठा ६५ % पेक्षा जास्त आहे.

पुणे, सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या समाधानकारक पाणीसाठा असल्याने बळीराजा सुखावला आहे.

पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे दररोज वाढणाऱ्या पाणीसाठ्या मुळे उजनी धरण लवकरच भरेल असा शेतकरी आंदज व्यक्त करत आहेत. उजनींच्या आसपासच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

1 Comments