सिरसाव बनतय कोरोना हॉटस्पाँट ; दोन किराणा दुकानदारास कोरोनाची लागण


गेल्या२४ तासात ४ नवे रुग्ण

सिरसाव/प्रतिनिधी;

मागील दहा दिवसापासून सुरु झालेले चक्र गावामध्ये थांबत असताना चे चित्र दिसत नाही. गावात दोन दिवसांत दोन किराणा दुकानदार सापडल्याने गावात चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही किराणा दुकानदारांच्या संपर्कातील लोकांनी स्वतः पुढे येऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी,अन्यथा गावची परिस्थिती अधिकच चिंताजनक होईल.अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून होत आहे. चार दिवसापूर्वी जो युवक बाधित आढळून आला होत्या त्यांचे आई वडीलांचे रिपोर्ट हि पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत गावातील एकूण १५ जनाला कोरोना ची लागण झाली असून त्यातील १ मयत आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सिरसाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments