एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती.
केंद्राने नुकतंच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसल्याचं सांगितलं होतं.मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
0 Comments