तहसीलदाराच्या घरावर एसीबीचा छापा; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले



हैद्राबाद ; हैद्राबाद शहरातील तहसीलदाराच्या घरावर एसीबीने छापा टाकला. तपासा दरम्यान सापडलेला काळा पैसा बघुन एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे फिरले.

हैद्राबादपासून वेगळे केलेल्या माकानगिरी या जिल्ह्यातील तहसीलदार बलराजू नागराजू यांच्या घराबर एसीबीने छापा टाकलाय. जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसीलदाराने 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

तहसीलदार बलराजू नागराजू यांच्यासाेबत एका ग्रामसेवकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. बी. साईराज असं त्या ग्रामसेवकाचं नाव आहे. 28 एकर जमिनीच्य व्यवहारात ही लाच घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments