बैल पोळा सणावर कोरोनाचे सावट ;कोरोनामुक्तीचे संदेश देत पोळा केला साधेपणाने साजरा...



पोळा हा आपल्या कृषीप्रधान देशातील व मराठी संस्कृतीतील महत्वाचा सण आहे.
जगावर कोरोनाचं सावट घोंगावत असून सर्व सण महोत्सवाला याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा पोळा सणांवर देखील कोरोनाचं सावट असून अमरावती जिल्ह्यात पोळाला घरीच पोळा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर यंदा आली आहे.

सार्वजनिक सुरक्षितता जपण्यासाठी शेतकरी बांधवांनी, सामूहिक पूजन न करता घरी, शेतशिवारातच पोळा साजरा करा करीत आहेत.
विवेकानंद युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज बैल पोळा सणानिमित्त आपल्या बैलाच्या पाठीवर जनजागृती म्हणी लिहून जनजागृती करण्यात आली.शिरसावं गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी युवा स्वंयसेवक अक्षय बरडे,  विवेकानंद युवा मंडळाचे सचिव रामेश्वर चोबे, राहूल चोबे यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.तसेच ही बैल जोडी गावामध्ये आकर्षक ठरली आहे, चर्चेचा विषय बनली आहे.

Post a Comment

0 Comments