कोरोनाच्या संकटकाळात डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलने सुरूवातीपासून सीपीआर च्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.अगदी पहिल्या महिन्यात हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्टिंगसाठी अद्ययावत लॅब सुरू करण्यात आली.त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सीपीआरच्या बरोबर या लॅब च्या मदतीने रिपोर्ट देण्याचे काम करता आले. एका टप्प्यावर सिपीआर कोविड रुग्णालय झाल्यावर बाकी सर्व उपचार करण्याचा भार सेवा रुग्णालय बावडा आणि डीवायपाटील हॉस्पिटने उचलला.
नंतर हॉस्पिटलला जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी कोविड उपचार सुरू झाले .हॉस्पिटलमध्ये चौथ्या मजल्यावर ३० बेडच्या वॉर्ड मध्ये ही कोविड उपचार सुरू झाले .पेशंट ची संख्या पाहून आयसीयू, तसेच अन्य २ वॉर्ड मध्ये , रूम मध्ये उपचार सुरू झाले. आणि ऑक्सीजन बेड ची गरज ओळखून casulity विभागात सुद्धा २० बेड ऑक्सीजन आवश्यक असणाऱ्या पेशंट साठी दिले आहेत.
सद्यस्थितीत कोरोना रुग्णांसाठी एकूण१६२ बेड असून ६३ बेड हे ऑक्सीजन बेड आहेत आणि ही क्षमता वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरूच आहे. व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध आहेत.
सीपीआर च्या खांद्याला खांदा लावून आज डीवायपाटील हॉस्पिटल ची कोविड विरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोना पेशंट साठीचा वॉर्ड , कोरोना संशयित पेशंट यांच्यासाठी वॉर्ड अशी सेवा देण्याचे काम या ठिकाणी सुरु आहे.
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील हे अगदी सुरुवातीपासून कोरोनाच्या लढाईत लोकांना आपल्या हॉस्पिटलमधून लोकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी आग्रही आहेत. सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील,मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.आर.के.शर्मा सर हेसुद्धा सातत्याने याचा आढावा घेत आहेत आणि सूचना करत आहेत.
या परिस्थितीत हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैशाली गायकवाड या ताराराणींचा वारसा जपत या कोरोना युद्धात आघाडीवर आहेत. डॉ.माने ,डॉ.खयालाप्पा, डॉ.जोटकर यांच्या समन्वयातून आणि मेडिसिन विभागातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून पेशंटवर उपचार सुरू आहेत. सोबतीला डॉक्टर्सची टीम सर्व आहे. तरुण रेसिडन्ट डॉक्टर नी केलेले काम कौतुक करण्यासारखे आहे.एमबीबीएस पूर्ण करून पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या या रेसिडन्ट डॉक्टरांनीसुद्धा पूर्ण झोकून देत काम।केले आहे. अशी १५० हुन अधिक डॉक्टर्स ची टीम येथे अहोरात्र काम करत आहेत. मेडिसिन विभाग, एनास्थेशिया विभाग हे आयसीयू वॉर्ड व्यवस्थापन तर इतर सर्व विभाग अन्य वॉर्डच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत आहेत.एखादी व्यक्ती उपचारासाठी अथवा स्वाब द्यायला आल्यावर स्क्रिनिंग करण्याचे काम डॉक्टर आणि स्टाफ काळजीपूर्वक करत आहेत.
हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील हे रात्रंदिवस योद्धा म्हणून काम करत आहेत, सर्व घटकांशी समन्वय ठेवत आहेत. हॉस्पिटलचे पीआरओ रमेश, विनोद,सुनील, संदीप, सौ.मेघा,सौ. सोनल हे सर्वजण लोकांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन अहोरात्र करत आहेत. नर्सेस , स्वछता स्टाफ, वॉर्ड बॉय या सर्वांच्या कामाला सलाम आहे.आणि स्वब चे रिपोर्ट वेळेवर मिळावेत म्हणून डॉ.आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रोमाचौगले ,डॉ.विश्वशांती व्हटकर आणि त्यांची टीम दक्ष आहे. रेडिओलॉजी विभाग , सर्व प्रकारच्या रक्त तपासणी ,ब्लड बँक, मेडिकल मधील स्टाफ सुद्धा सेवेसाठी तत्पर आहे.
या काळात सेवा बजावताना डॉक्टर, नर्स, क्लार्क, पीआरओ, अटेंडन्ट हे कोरोनाबाधित झाले पण उपचार घेऊन हे सर्वजण पुन्हा रुग्णसेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोरोनाच्या काळात इनआयसीयू ,प्रसूती विभाग हे विभागसुद्धा कार्यरत आहेत.लोकांची गरज ओळखून त्यांच्या घरी जाऊन सुरक्षितपणे स्वाब घ्यायची व्यवस्था केली आहे.
हॉस्पिटलमध्ये लोकांना दर्जेदार जेवण देण्याकडे कटाक्षाने व्यवस्थापन लक्ष देत असते. या सर्व प्रयत्नामुळे कोरोनाचे पेशंट बरे होण्याचे प्रमाण हे खूप असून अगदी ८८ वर्षे वयाचा रुग्णासुद्धा कोरोनामुक्त झाला आहे.हॉस्पिटलमधील सर्व घटकांनी या कोरोना संकटात केलेले काम माणुसकीचा धागा घट्ट करणारा आहे.
1 Comments
👍👍👍
ReplyDelete