दिल्ली - देशात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात चालू आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या हा आता देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने अमेरिका आणि ब्राझिलला सुद्धा मागे टाकले आहे. देशात गेल्या १४ दिवसांपासून रोजच ५० हजारांच्या वर कोरोनारुग्ण सापडत आहे. गेल्या २४ तासात देशात पुन्हा ६० हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. देशात मृत्युचे प्रमाण ही वाढत चालले आहे. गेल्या २४ तासात ८३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून, आतापर्यंत कोरोनाने देशात ४६ हजार ९१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात आतापर्यंत २३ लाख २९ हजार ६३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी सुमारे १६ लाख ३९ हजार ५९९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशात ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 70.37 टक्के इतका आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना दिलासादायक बाब म्हणजे देशात मृत्युचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षाही कमी झाले असून सध्या १.९९ टक्के मृत्युदराचे प्रमाण देशात आहे.
0 Comments