कोल्हापूरातील कोरोना ग्रस्तांची संख्या रोज वाढत आहे, त्या बरोबरच रक्ताच्या बाटल्यांची मागणीही
वाढत आहे. लॉकडाउन आणि कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे आणि इतर
वेळी जशी रक्तदान शिबिरे आयोजित करता येतात तशी आता कोरोनाच्या निर्बंधामुळे करता येत नाहीत.
त्यामुळे यापूर्वी हिरीरीने रक्तदान शिबिरे आयोजित करून मिळवलेल्या रक्ताचा साठा जवळपास
संपला आहे, अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसारित झाली होती.
याचीच नोंद घेवून सामाजिक आणि जनभावनेने रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे सुरक्षित व सामाजिक
अंतर पाळत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात केले होते. सदरचे आयोजन हे ८ ऑगस्ट ते १५
ऑगस्ट करण्यात आले होते, या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. दोन टप्प्यात याचे नियोजन
केले होते, सकाळच्या सत्रात ३ रक्तदाते आणि दुपारच्या सत्रात ३ रक्तदाते अशी वेळ ठेवण्यात आली होती. शाहू ब्लड बँक, बसंत रोड, पतंजली मॉल समोर याचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराची सांगता १५ ऑगस्टला पेटलेट्स डोनेशन देऊन झाली.
या वेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष श्री. अरविंद कृष्णन, सचिव श्री. सिद्धार्थ पाटणकर व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर चे मानव गुळवणी, साहिल गांधी, आदित्य शहा, सुधांशु रुकडीकर, अथर्व ढनाल, संदेश पाटील, मृणाल शिंदे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
"सुरक्षित व सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा योग्य वापर, एक वेळी फक्त ३ रक्तदाते, रक्त देणाऱ्या
व्यक्तीची प्रवासाची माहिती तसेच आरोग्याचाही माहिती घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
आणि याला सुजाण कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला.”
- अभिजीत पाटील, अध्यक्ष
रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर
0 Comments