धनगर ऐक्य अभियानकडून मुख्यमंत्र्याना रक्तरंजित निवेदन


पंढरपूर/प्रतिनिधी;

धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तसेच समाजाच्या इतर मागण्यांचे रक्ताने लिहीलेले निवेदन १३ ऑगस्ट रोजी धनगर ऐक्य अभियानच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले. हे रक्तरंजित निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांनाही पाठवून देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगतिले.
या धनगर समाजातील कार्यकर्तानी स्वताच्या रक्ताने हे निवेदनाचे लिखण केले. 

या निवेदनात धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषीत केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी एक हजार कोटींची तरतूद ताबडतोब करा तसेच मेंढपाळांना आरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा आदी मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन सादर करण्यात आले. उपरोक्त मागण्यांचा गांभीर्याने विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सदर निवेदन धनगर ऐक्य अभियान चे माऊली हलनवार यांच्या नेतृत्वात अनिकेत देवकते, पंकज देवकते,  मिलिंद येले याचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments