✒️भूषण हंकारे
माणसाचा श्वास बंद होतो म्हणजे माणसाला मरण येत का? छे...!! तो आतून खूप आधी मेलेला असतो, म्हणून तो सगळा त्रास संपवतो. जगण्याची कोणतीच इच्छा नसणारा, ना त्या आयुष्याकडून कोणती अपेक्षा असणारा खूप सहज मरण कवटाळतो पण जिद्द असणारा जगण्याची इच्छा असणारा कॅन्सरवर पण मात करतो. हे बोलायला ना लई सहजसोप आहे. नैराश्य, एकटेपणा या गोष्टींना आपण कधीच फारसं महत्व देत नाही. जर कोणी अस बोललं की I am going through depression आपल्या आसपासचे लोक, मित्र, घरचेहो घरचे सुध्दा फिदीफिदी हसतात.
तुला काय झालय रोजसारखा तर दिसतोस आणि मग काही दिवसानी त्याने जीव दिला की कळतं रोज सारखं दिसण्यामागे त्याच रोजसारखं असणं कुठेतरी हरवलं होत. ते परत मिळवायसाठी, शोधायसाठी तर त्याने ते शेअर केलेलं हे उमगत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काय कमी होत? डिप्रेशन काय आहे आणि त्यात हालत काय होते हे ज्याने अनुभवलयं तो मुळात असे मुर्खासारखे प्रश्नच विचारणारच नाही. Worthless पणाची फिलींग अनुभवली आहे का कधी? आणि ती का येते माहीतीय? मग फुकटच्या तोंडच्या वाफा का वाया घालवायच्या? ज्याच्यासोबत आपण आपलं आख्ख दू:ख शेअर करतो ना त्याला आपलं मानून साला तो ही शेवटी आपल्यालाच जज करून चालता होतो. तेव्हा जी worthless फिलींग असते ना.. कोणी नाही समजू शकत अनुभवल्याशिवाय आणि जास्त करून ही भावना आपल्याच लोकांनी दिलेली असते.
जीव का दिला? हा उपाय नाही. हा पर्याय नाही. खंबीरपणे लढावं, तोंड द्यावं हे जितकं नॉर्मल, स्टेबल माणसासाठी बोलायला सहज असत ना तितक त्याहून कित्येक पटीने त्या नैराश्य, एकटेपणाशी दोन हात करणाऱ्याला मरणाचं कठीण आणि असाह्य असत. ती परिस्थिती अशी असते जिथे समोरचा कितीही बोलला मी समजू शकतो. ही वेळ सुध्दा निघून जाईल आणि सर्व ठीक होईल ते त्या माणसाच्या कानापर्यंत जात असत मात्र डोक्यात नाही कारण त्याचे अनुभव, त्याचा स्व:ताभोवती असणाऱ्या अनुभवांच्या कोशात तो गुरफटलेला असतो. तो काळ, ती वेळ, ती पोकळी तो कसा आणि काय-काय करुन भरायचा प्रयत्न करत असतो त्यालाच माहीती पण शेवटी रितेपणाची भावना काही जात नाही.
कोणीही माझं नाही. कोणीही मला समजून घेत नाही. समजू शकत नाही. मी का जगतोय आणि नाही जगलो तर काहीच फरक नाही पडणार ही भावना मनाला जेव्हा ग्रासते ना तेव्हा तो माणूस जीवनापासून खूप आधीच दूर गेलेला असतो. त्यात त्याच्या परिस्थितीवर अजून लोकांनी त्याला ऐकवलं, विरोधी भाष्य केल की तो अजून खोल त्या नैराश्याच्या गर्तेत ढकलला जातो.
हसरे चेहरे फसवे असतात जगासोबत ते जगासारखे असतातही पण रात्रीच्या शांततेत जेव्हा खोल्यांची कवाड बंद होतात तेव्हा त्यांना मात्र मृत्यूची कवाड खुणावत असतात. ऱोज रात्री आता बस... असं म्हणत असतात. तो एक क्षण जेव्हा सर्व senses वर भारी पडतो तेव्हा माणूस हे असं पाऊल उचलतो. किती तरी suicide attempt करुन वाचलेली लोक स्व:ता शॉक असतात की मी हे का केल? मला करायचं नव्हत आणि ज्यांना मरण समोर दिसत असत ती सुध्दा मरणाचा प्रयत्न करुन मला जगायच म्हणून रडत असतात. तर सांगायचा मुद्दा इतकाचं की ती एक मानसिक स्थिती असते त्यात माणूस काय करतोय? का करतोय? काय बोलतोय हे त्याला अजिबात कळत नसत. त्यामुळे जज करणं फार चूक होईल. कारण, भिती, राग, नैराश्य, इरिटेशन आणि बरचं काही एकामागे एक त्याला ग्रासत असत. त्याला ना सावरता येत असत ना काही सुधरत असत.
1 Comments
(त. टी. - मेल्यावर लोकांना जज करण्यापेक्षा जिवंत असताना त्यांच्यावर प्रेम करा. Worthless तर ऐर गैर कोणीही कोणाला ठरवू शकत पण जर कोणाला Your worth having ही फिलींग देता आली तर जास्त रास्त होईल जन्म..
ReplyDeleteमेल्यानंतर कोण नसत ऐकायला निदान जे जिवंत आहेत त्यांच्या डोक्यात तरी निगेटीव्हीटी पेरु नका.)
-भूषण