इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. दोन ते सात क्रमांकामध्ये भाजप, कॉंग्रेसेतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी पाचवे स्थान पटकावले आहे.
‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ या नावे सर्वेक्षण केले. देशातील ९७ संसदीय मतदारसंघ आणि राज्यांमधील १९४ विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते (२४ टक्के), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप) दुसऱ्या, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्या, तर उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. तरी लोकप्रियतेच्या कसोटीवर ठाकरे यांनी पहिल्या सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान पटकावल्यामुळे शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
0 Comments