सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर शहारात सात दिवासांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत ही घोषणा केली.
पंढरपूर शहरात ७ आगस्ट २०२० ते १३ ऑगस्ट २०२० या दरम्यान लॉक डाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. दूध ,मेडिकल वगळता कडक संचारबंदी असणार आहे. पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला जावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , सोलापूरचे आयुक्त शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हणाले की, पंढरपूर आणी परिसरामध्ये येत्या ६ तारखेच्या मध्यरात्री १२ पासून म्हणजे ७ तारखेच्या पहाटेपासून १३ च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लागू होणार आहे. प्रदक्षिणा मार्ग आणि जास्त प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. परिस्थिती पाहून डाऊनमध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते. केवळ दूध, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.
0 Comments