🖋️ धनंजय कुंभार
कोरोना या महामारीचा विळखा संपूर्ण जगाला बसला आहे, खात्रीपूर्वक औषध किंवा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शक्य तितकी खबरदारी घेणं हा एकमेव उपाय म्हणून पहिला जातो. कोरोना या व्हायरस मुळे होणारा हा आजार covid-19 म्हणून संबोधला जातो. या आजाराची सर्वसामान्य लक्षणे ही तीव्र ताप, खोकला, श्वसनाच्या समस्या अशी आहेत. अधिकतर रुग्णांमध्ये हीच लक्षणें प्रामुख्याने दिसून येतात. पण क्वचितच काही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणें जसे की बुबुळाच्या पुढील भागात दाह होणे, डोळ्यांच्या पांढऱ्या भागाचा रंग बदलणे.
लक्षणें:
आतापर्यंत च्या आकडेवारी मधून अशी माहिती समोर आली आहे की COVID-1 मधील 1-3% लोकांना डोळ्यांच्या पुढील भागात दाह होतो, याला पिंक असेही म्हटले जाते. जेव्हा या विषाणूंचे डोळ्यांमध्ये संक्रमण होते तेंव्हा हा विषाणू डोळ्यांचा पांढरा भाग किंवा आपल्या पापण्यांच्या आतील भागाला कंजक्टिवाइटिस नावाच्या उतींना संक्रमित करतो तेव्हा अशी लक्षणे दिसू लागतात. डोळे आल्यानंतर जशी लक्षणं दिसतात ही अगदी तशीच लक्षणं असू शकतात.
यामध्ये
१.डोळे लाल होणे
२.डोळ्यांना सूज येणें
३.डोळ्यांना खाज सुटणे
पण केवळ डोळ्यांना ही लक्षणे असतील तर आपल्याला कोरोना आहे असं सिद्ध होत नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे ही अशी लक्षणे दिसू शकतात जसे की विषाणूंचे, जीवाणुचे किंवा रसायन अथवा अलर्जी मुळे पन अशी लक्षणे दिसू शकतात आणि यामुळे पन डोळ्यांना त्रास उद्भउ शकतो.
कंजक्टिवाइटिस चे बरेच प्रकार 1-2 आठवड्यात उपचाराने पूर्ण बरे होऊन जातात, पन जर आपल्याला ताप, खोकला, घश्यात खवखवणे किंवा श्वास लागले अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचं ते ठरवता येऊ शकत. त्यानुसार वैद्यकीय तपासणी करून घेणं योग्य ठरेल.
संक्रमण नक्की कसे पसरते:
SARS-COVID-2 नावाचा नवीन कोरोना व्हायरस मुख्यतः शिंक किंवा खोकल्याच्या लहान थेंबांमधून जातो. हे लहान कण नाकातून किंवा तोंडातून आणि डोळ्यांमधून सुद्धा प्रवेश करू शकतात. आपण संक्रमित पृष्ठभागावर स्पर्श केल्यानेही व्हायरस च्या कचाट्यात सापडण्याची शक्यता जास्त असते.
जर आपल्याला COVID-1 मुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागास दाह होत असेल तर आपले डोळे स्पर्श करून ते हात निर्जंतुक न करता इतरांना स्पर्श केल्याने त्यांनाही या व्हायरस ची लागण होऊ शकते. अशा स्पर्शाने SARS COVID-2 ची लागण होऊ शकते, त्यामुळे आपल्या तोंडाला, नाकाला आणि डोळ्यामधील ओलसर भागास स्पर्श करणे टाळाचं.
आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा
या महामारीचा काळात अनेक छोटे-मोठे खासगी दवाखाने तात्पुरते कधी कधी बंद केले जात आहेत. त्यामुळे डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणं टाळा आणि कॉल किंवा सोसिएल मीडिया चा वापर करून योग्य ते मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांची लक्षणे दिसलीत तरी।घाबरून न जाता किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क करा.
खासकरून खालील समस्या असणाऱ्या रुग्णांनी,
मॅक्युलर डीजनरेशन
डायबेटीस रेटिंनोपॅथी
रेग्युलर आय इंजेक्शन
दृष्टी कमी येणें किंवा असणे
डोळ्यात वेदना होणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी मळमळ आणि उलट्या असणे.
डोळ्यांचे संरक्षण आणि काळजी कशी घ्याल?
➡️आपले हात वारंवार स्वच्छ धुवा
➡️शक्य असेल तर घरीच राहा.
➡️जर आपण बाहेर गेलात तर इतरांपासून 6 फूट अंतरावर ठेवा.
➡️मास्क वापरा.
➡️विनाकारण डोळे, नाक आणि तोंडाला।हात लावू नका.
➡️चष्मा घाला.
➡️आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस घातल्यास थोडासा चष्मा वर स्विच करा.
➡️लेन्स आपल्या डोळ्यांना कोणत्याही श्वसनाच्या थेंबांपासून वाचविण्यास मदत करू शकतात.
➡️आपण चष्मा न घातल्यास, सनग्लासेस वापरुन पहा.
➡️डोळे चोळू नका.
➡️रुमाल ऐवजी टिशू कागदाचा वापर करा.
#corona #covid19 #coronaandeye #eye #eyecare
0 Comments