आजऱ्यात पावसाची धुवाधार;पुन्हा एक वर्षाने आला आजऱ्यात मच्छिंद्राचा योगायोग




राकेश करमळकर/ आजरा :

 देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीनुसार  तब्बल एक वर्षाने दि ५ तारखेला पुन्हा एकदा विक्टोरिया फुलाची मच्छिंद्री झाली आहे. गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पडू लागला आहे. 

गेले तीन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी फुटून पात्राबाहेर पडली आहे. तालुक्यातले किटवडे, साळगाव, हजगोळी, सरोळी व इतर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदी शेजारच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजरा शहरालगत नदीवर असणाऱ्या विक्टोरिया पुलाची मच्छिंद्री झाली आहे.

 तब्बल एक वर्षानंतर हा योगायोग जुळून आला आहे मागील वर्षीही 5 ऑगस्ट रोजी मच्छिंद्री झाली होती. जुळून आलेला योगायोग म्हणजे निसर्गाने दाखवलेला एक चमत्कारच आहे अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments