मुलगा कोरोना पॉजिटिव्ह आला म्हणून वयवृद्ध वडिलांची आत्महत्या


पंढरपुर/प्रतिनिधी;

सांगोला तालुक्यातील बामनी गावात मुलास कोरोनाची लागन झाल्याच्या भीतीने वयवृद्ध वडिलांनी घराजवळील जानवरांच्या पत्राशेडमधील लोखंडी अँगला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. आंनदा धौंडिबा कोलेकर (७०) असे आत्महत्या केलेल्या वयवृद्ध नाव असून.

 बामणी येथील वामन आनंदा कोलेकर यांचा ११ ऑगस्ट रोजी कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला. आरोग्य विभागाकडून त्यांना कमलापुर येथील कोविड सेंटरमधे दाखल करण्यात आले. त्यानंतर कोलेकर यांच्या घरातील सदस्याची कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी येणार असल्याची माहिती आनंदा कोलेकर यांना मिळाली. 
 मुलाची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यामुळे आता आपलीही कोरोना चाचणी पॉजिटिव्ह येणार या भीतीपोटी आनंदा कोलेकर यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घराशेजारील जानवारांच्या पत्राशेडमधे गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सुन लक्ष्मी कोलेकर ही जानवरांचा पत्राशेड स्वच्छ करण्यासाठी गेली असताना त्यांना आंनदा कोलेकर यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा करून घरातील सर्वाना जागे केले. महेश पांढरे, हरी कोलेकर यांनी आनंदा कोलेकर यांना उपचारासाठी  सांगोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Post a Comment

0 Comments